भुसावळातील खानदेश अंध कल्याण संस्थेने पेरला प्रकाश
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील दीपोत्सवानिमित्त खानदेश अंध कल्याण संस्थेच्या सदस्यांना रवा, मैदा, तूप, साखर, डाळ, तेलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी असल्याने प्रत्येकाच्या घरी गोडधोड व्हावे यासाठी साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांची दिवाळी झाली गोड.
यावेळी लिलाई हॉलमध्ये शनिवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास स्नेहदीप निराधार महिला आश्रमाच्या चेअरमन आरती चौधरी, वैशाली भगत, राजेंद्र आवटे, चेतन पाटील, दिलीप पटवारी, किरण पाटील, डॉ.बाळू पाटील, संजय पाटील, रतन पाटील, सुरेश पाटील, महेंद्र अतुलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. यावेळी भुसावळ परीसरातील तसेच जळगाव, चाळीसगाव, पाचोरा येथील सुमारे 40 भगिणी व बांधव उपस्थित होते. दिवाळी सुरू झाल्यामुळे प्रत्येकाच्या घरी मोठा उत्साह जाणवत आहे. यातच या दिव्य चक्षू बांधवांच्या घरी सुध्दा आनंद निर्माण व्हावा यासाठी समाज बांधवांनी एकत्र येत खानदेश अंध कल्याण संस्थेच्या सदस्यांना रवा, मैदा, तूप, साखर, डाळ, तेल यांचे वाटप केले. यावेळी दिवाळीनिमीत्त या बांधवांना जेवण देण्यात आले.
स्नेहदीप निराधार महिला आश्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी प्रत्येक दिव्य चक्षू बांधवांची चौकशी केली, लवकरच वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याबाबत आपण सर्व मिटींग घेऊन त्यवर निर्णय घेऊ असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.