शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । जवळपास पंधरा दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील ४५ हजार शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ऐन दिवाळीच्या दिवसात शिक्षक आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूलता दर्शवलेली आहे. विना / अशंत: अनुदान तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक आंदोलन करीत आहेत.
एडवोकेट तुकाराम शिंदे यांनी शिक्षकांची दिवाळी गोड करण्यासाठी मध्यस्थी करुन प्रा. दीपक कुलकर्णी प्रा. अनिल परदेशी प्रा. राहुल कांबळे यांचे शिष्ट मंडळ वर्षा बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री न्याय देण्याच्या भूमिकेत असताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती संचलित करण्याच्या नावावर निर्णय लांबविला असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
शासन निर्णयाचे अधिकृत प्रत जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.