जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । शहरातील खाजगी व्यापार्याच्या खिशातील ९८ हजारांच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडीस आली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आनंद रमेशचंद्र जैन (49, रा.महाबळ कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून खाजगी व्यापार करतात. बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता ते महाबळ परीसरातील घारपुरे स्वीट मार्ट जवळून जात असताना त्यांच्या जवळील 98 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.