भुसावळ विभागातील अनुकंपा तत्वावर 101 कर्मचार्यांना नियुक्त्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘रोजगार मेळाव्या’चा शुभारंभ केला. या रोजगार मेळाव्याचा उद्देश पुढील एका वर्षात देशभरात 10 लाख तरुणांना रोजगार देणे हा आहे. या अंतर्गत दर महिन्याला 75,000 हून अधिक पात्र तरुणांची भरती केली जाईल. या अंतर्गत दिवाळीच्या सुरुवातीलाच आज 75,000 तरुणांना सरकारी नोकरीचं ऑफर लेटर देण्यात आलंय. ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते हे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. त्यात भुसावळ येथील रेल्वे विभागाच्या 101 कर्मचार्याचा सहभाग आहे.
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर रोजगार मेळाव्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या.या रोजगार मेळाव्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. या कार्यक्रमात एडीआरएम रुकमय्या मीना, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे, वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.एस.काजी, सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके, गोविंदकुमार सिंग आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.वडनेरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व कल्याण निरीक्षक व भरती विभागाने सहकार्य केले.