⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

मोठी बातमी ! चाळीसगाव एसटी बसचा भीषण अपघात ; 27 प्रवाशांना दुखापत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । राज्यात एसटी बसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात 27 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींमा पिंपळगाव पसवंत येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, बसचे ब्रेकफेल झाल्यामुळे ही अपघाताची घटना घडली अशी माहिती समोर येत आहे. घटनेमुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव आगाराची एसटी (क्रमांक एम एच 40 एन 9817) बस चाळीसगाव येथून कल्याणच्या दिशेने जात होती. या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर 13 नंबर लेनवर ही एसटी भरधाव वेगाने आली. यावेळी या एसटी बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने समोर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात बसमध्ये असलेल्या जवळपास 27 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या जखमी प्रवाशांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेमुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर खान्देशाच्या दिशेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नेहमी ठिकठिकाणी एसटी महामंडळाच्या बंद झालेल्या गाड्या नेहमी बघायला मिळतात. या गाड्या रस्त्यातच धोका देतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. एसटीला लालपरी म्हटलं जातं. लालपरीचा प्रवास अनेकांना आवडतो. पण याच लालपरीची अवस्था बिकट झालीय. अनेक गाड्या या जुन्या झाल्याने लांबच्या प्रवासावेळी धोका देतात. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या जुन्या झालेल्या बसेसचं प्रशासनाला काही नियोजन करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.