⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | ..म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? खडसेंनी सांगितले कारण

..म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? खडसेंनी सांगितले कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । भोसरी भूखंड प्रकरणाची एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची पुन्हा चौकशी होणार आहे. या चौकशीचे आदेशही काढण्यात आले आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता. मात्र यावरून आता एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, असं म्हणत खडसें यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आत्तापर्यन्त चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे, सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे. एकूणच खडसे यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असतांनाच या चौकशा सुरू झाल्या होत्या, त्यात मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसे यांना अटक होईल अशी चर्चा देखील होती, मात्र खडसे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची कारवाई टळली होती.

तसंच, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातात आलेली नाही अशा स्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्यांची टिंगल उडवली जात असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकतर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका, असे खडेबोलही एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्र्यांना सुनावले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.