T20 World Cup 2022 : आज भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामना नेमका किती वाजता सुरु होणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । T20 विश्वचषक 2022 मध्ये आज (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. दहा सामना मेलबर्न येथे आज रविवारी होणार आहे. पण सामन्यावर पावसाचे सावट आहे. आज रविवारी मेलबर्न येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे हा सामना नेमका कधी सुरु होणार, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. पण हा सामना आता किती वाजता सुरु होणार आहे, याचे कारण आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी मैदानाची पाहणी ही साधारणपणे दुपारी १२.०० च्या दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सामन्याचा टॉस होईल. टॉसचा निकाल लागल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार हे आपलं संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपाला संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासांचा ब्रेक घेतला जाईल. या ब्रेकनंतर हा सामना दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना दुपारी १.३० ते साधारणपणे ४.३० वाजेपर्यंत पाहायला मिळू शकतो.
पण जर पावसाने या सामन्यात घोळ घातला तर मात्र हा सामना कधी सुरु होईल, हे सांगणे सर्वात कठीण असेल. कारण पाऊस थांबल्यावर सामन्याचे पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर मैदान कधी सुकवलं जाईल याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर मैदान सुकले की नाही याची ते पुन्हा पाहणी करतील आणि त्यानंतर दोन्ही संघांना सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार, याची कल्पना देतील. त्याचबरोबर हा सामना किती षटकांचा खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही ते दोन्ही कर्णधारांना देतील. त्यानंतर दोन्ही संघ या माहितीनुसार आपली रणनीती आखतील.
IND vs PAK T20 विश्वचषक 2022 सामना Disney + Hotstar अॅपवर थेट पहिला जाऊ शकतो. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतात टीव्हीवर लाइव्ह देखील पाहता येईल. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्याचे थेट पाहू शकता.
भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर :
भारतीय संघ सध्या ICC T20 क्रमवारीत अव्वल तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने नुकत्याच झालेल्या पाच टी-२० सामन्यांपैकी चार जिंकले आहेत. त्याने अधिकृतपणे दोन सराव सामन्यांमध्ये भागही घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ६ धावांनी जिंकला, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), हैदर अली, मोहम्मद नवाज, इफ्तिखार अहमद, शान मसूद, आसिफ अली, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ. लाइव्ह टीव्ही