जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. क्रीडा प्रशिक्षक विजय आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची झलक या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो.
अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल. या ट्रेलरमध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
झुंड सिनेमा सप्टेंबर २०१९ मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र त्यादरम्यान कोरोना, लॉकडाउन असे काही अडथळे प्रदर्शनाच्या वाटेत निर्माण झाले. निर्मात्यांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केला होता, मात्र नागराज मंजुळेंना हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याची इच्छा होती.
हे देखील वाचा :
- योगेश चौधरी यांनी कॉम्पुटर सायन्समध्ये पीएचडी मिळविली
- शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता जमा; तुम्हाला मिळाला का? असे चेक करा
- एकही लाभार्थ्याला जागा व घरकुलापासून वंचित राहू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
- अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचण्यासाठी महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे; रोहिणी खडसे
- Nissan ची नवीन कार लाँच; दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वस्तात खरेदी करा