जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील तरुणाला गावठी कट्ट्यासह जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर पाटील (25, रा.नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, संतोष मायकल, भारत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयीत अर्जुन भास्कर पाटील (25, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ) याच्या ताब्यातून गावठी बनावटीची 25 हजार रुपये किंमतींची पिस्टल जप्त करण्यात आली. त्याच्याविरुध्द भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.