जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आलीय. पती अन् पत्नीमधील किरकोळ वाद गेला. पतीने पत्नीसह आपल्या पोटच्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीने स्वत:देखील आत्महत्या केली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विशाल मधुकर झनके असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रतिभा झनके आणि दिव्या झनके या मुली आहेत.
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे ही घटना घडली. विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे. दरम्यान, पती अन् पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर पत्नी नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. त्या महिलेचा पती त्या ठिकाणी पोहचला.
त्यावेळी सासराच्या घरात कोणी नव्हते तेव्हा विशाल झनके तिथे आला. यावेळी ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून विशाल झनके फरार झाला. हत्या केल्यानंतर तो मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:चे जीवन संपवले. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. विशाल झनके याने हे कृत्य का केले? याची कारण अजून स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे.