गंगापूरी येथील गरीब वस्तीच्या वंचितांची ‘दिवाळी’ झाली गोड
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ येथे दिवाळी सण निमित्ताने सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना गरीब व गरजूंचाही सण उत्साहात साजरा होण्यासाठी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून घरातील चांगले कपडे व दिवाळीचे फराळ एकत्रीत करीत गंगापूरी येथील गरीब वस्तीत वाटप केले. चिमुकल्यांना कपडे तर महिलांना कपडे व साड्या तसेच दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले तसेच राहुल नगराजवळील वस्तीतदेखील हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर, शिक्षक गोपाल जोनवाल, अर्जुन सणस, विजय संकत, निलेश फंड, डॅनिअल पवार, रचना महाजन, सोनिया टेकवानी, शेफाली श्रीवास्तव आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर म्हणाल्या की, आमची शाळा गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवत असून या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब वस्तीपर्यंत घरोघरी दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आल्याचा हा आनंद आहे.