⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुक्ताईनगरांच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

मुक्ताईनगरांच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी अशी मांगणी 20 ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

मुक्ताईनगर मतदार संघातील रखडलेल्या कामांना पुनर्वसनासह शेती, शिव रस्ते दर्जोन्नत करावेत, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे. मुक्ताईनगर येथे एस.टी.महामंडळाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारावे, व अ‍ॅम्युजमेंट पार्कची उभारणी करावी, अशा विविध प्रकल्पांवर निधीची तरतूद करावी यासह मतदार संघातील अनेक विविध विकास कामांसंदर्भात गुरुवार 20 ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रसंगी मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह