जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । दिवाळी या सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने विभाग नियंत्रक भगवान जगनुर यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल बस आगार व्यवस्थापक व्ही एन पाटील व स्थानक प्रमुख गोविंद बागुल यांनी एरंडोल दोंडाईचा ( बेटावद नरडाणा मार्गे ), ठाणे रातराणी या नव्या बस सेवांसह एकूण दहा नव्या गाड्या सुरू केल्या आहेत प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
एरंडोल बस आगारातर्फे सकाळी सात वाजता एरंडोल दोंडाईचा ( अमळनेर बेटावद नरडाणा शिंदखेडा मार्गे ) नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे टाकरखेडा, अंमळनेर, नरडाणा या ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय सणासुदीच्या दिवसात झाली आहे तसेच एरंडोल येथून संध्याकाळी पाच वाजता ठाणे रात राणी ही नवीन गाडी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची किंवा मुंबईहून परत येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तर दोंडाईचा गाडीमुळे थेट जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामीण जनतेची गैरसोय दूर होणार आहे.
इतर सेवा पुढीलप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता एरंडोल औरंगाबाद, सहा वाजता धरणगाव नाशिक, साडेसहा वाजता एरंडोल शिरपूर, सकाळी सात वाजता एरंडोल सुरत, आठ वाजता चाळीसगाव मार्गे एरंडोल पुणे, दुपारी १२.१५ वाजता एरंडोल जळगाव औरंगाबाद, एक वाजता एरंडोल अकोला, एक वाजता एरंडोल सुरत.