⁠ 
रविवार, मे 19, 2024

मुक्ताईनगरात ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शुभारंभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । दिवाळी सण हा सर्वांचा गोड व आनंददायी होण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अर्थात शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्वेता संचेती यांच्याहस्ते धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जनसामान्य नागरीकांची दिवाळी ही गोड व आनंददायी होणार आहे. शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनादाळ, एक किलो साखर व एक लीटर पामतेल उपलब्ध झाले आहे. आमदार चंद्रकांंत पाटील यांनी घेतलेल्या आढाव्यात मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील दहा तर शहरातील सहा धान्य दुकानांवर तर बोदवड येथील 13 तसेच रावेर भागातील 22 सदरील किट उपलब्ध असून येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघातील प्रत्येक रेशन धान्य दुकानांवर हे किट उपलब्ध होणार आहे.

यावेळी शिवसेनाा तालुकाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक निलेश शिरसाट, संतोष मराठे, राजेंद्र हिवराळे, संतोष कोळी, दिलीप पाटील, वसंता भलभले, शिवसैनिक व शिधा लाभार्थी होते.