⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | खामखेडा पूल अंतुर्ली परिसरासाठी मोठी उपलब्धी : रोहिणी खडसे

खामखेडा पूल अंतुर्ली परिसरासाठी मोठी उपलब्धी : रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा निंभोरासीम-पिंप्रीनांदू पूल हा अंतुर्ली परिसरासाठी खूप महत्वाचा ठरला असून शसकीय कामकाजासाठी नागरीकांना मुक्ताईनगरला येण्या- जाण्यासाठीचा फेरा कमी झाल्याने वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. या पुलांसह बोदवड तालुका निर्मिती, मुक्ताईनगर नामकरण सोहळा आदी ऐतिहासिक कामांची नोंद घ्यावीच लागेल असे मत रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या विसाव्या दिवशी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड, भोकरी, धामणदे, नरवेल येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, सोपान पाटील, विलास धायडे, किशोर चौधरी, प्रदीप साळुंखे, पवन पाटील, विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, सुधीर तराळ, सोपान दुट्टे, राम पाटील, मुळा पाटील, भाऊलाल पाटील, गणेश तराळ, बाळा भालशंकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह