जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं ‘मला पाणीवाला बाबा बनायचंय’ हे विधान गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरल होत.मात्र वाईट बाब म्हणजे आता हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यात भर हिवाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पाणी टंचाईमुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तब्बल तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून नागरिकांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याच बरोबर शाळकरी विद्यार्थ्यांवर पाणी भरण्याची वेळ आलीय तर शाळा बुडवून काही विद्यार्थांना पाण्यासाठी घरी राहावे लागत आहे. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी आकाशातून पाणी देवू का? असं म्हटलंय.

“पाऊस अधिक झाल्यामुळे नद्यांना पाणी आले आहे, पाणी पुरवठा करणारे पंप गाळात रुतले आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही, ही स्थिती असताना नळांना पाणी आकाशातून टाकतील काय,” असा सवाल राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.








