⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

मी स्वत: मुख्यमंत्री, मला मंत्री काय करता? – आमदार किशोर पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १९ ऑक्टोबर २०२२ । शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. मात्र पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने आणि मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

यातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश आहे असे म्हटले जात आहे.मात्र यावर बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? अश्या शब्दात आमदार किशोर पाटील त्यांनी आपण नाराज असल्याच्या बातम्या फेटाळल्या

आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असे आमदार किशोर पाटील म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे. एखाद्या घरातील आमदार दगावला असेल तर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली असेल तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे. भाजपाने माघार घेतल्याने अतिशय चांगला निर्णय घेतला असे ते म्हणाले.