जळगाव जिल्हाभुसावळ
मराठा बटालियनतर्फे सावद्यात माजी सैनिकांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । सावदा येथील रहिवासी माजी सैनिक एकनाथ चौधरी त्यांच्या राहत्या घरी जावून पंधरा मराठा बटालियनतर्फे 50 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त माजी सैनिक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
एकनाथ काशीराम चौधरी यांनी वयाच्या अठराव्या वर्षी देशसेवेचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला बेळगाव (कर्नाटक) येथे प्रशिक्षण घेतले. पश्चिम बंगाल, पंजाब, मिझोरम, काश्मीर, राजस्थान, हैद्राबाद नागपूर या ठिकाणी सेवा बजावल्यानंतर 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी एकूण 19 वर्ष आर्मीत तर 20 वर्ष पोलिस दलात कामगिरी बजावली. देशसेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ते सावद्यात कार्यरत असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय चौधरी त्यांचे वडील आहेत.