जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगरात मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या निलंबित निरीक्षक किरण बकाले यांना तत्काळ अटक करावी व त्यांना खात्यातून बडतर्फ करावे या मागणीसाठी सोमवार, 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले.
या आंदोलनात सर्व मराठा समाज बांधव, सकल मराठा समाज, मुक्ताईनगर तालुका तसेच मराठा समाजातील इतर सर्व संघटनांचे पदाधिकार्यांसह आमदार चंद्रकांत पाटील, मराठा समाज तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, तालुका उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यु.डी.पाटील, संदीप बागुल, ईश्वर रहाणे, दिनेश कदम, दिलीप पाटील, साहेबराव पाटील, मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटु भोई, छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन मालवदकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगलकर, मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, साहेबराव पाटील, डॉ.सुनील उदे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक निलेश शिरसाट, विनोद पाटील, विकास पाटील, चंद्रकांत भोलाने, प्रफुल जवरे, प्रफुल पाटील, गणेश टोंगे, नगरसेवक मुकेश वानखेडे, महेंद्र मोंढाळे यांच्यासह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना मराठा समाज बांधवांनी निवेदन दिले.