जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्या प्रकरणी येथील शहर पाेलिस ठाण्यात एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवळी वाड्यातील रहिवासी नवावलाल गवळी याने शनिवारी (दि. १५) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एका महिलेकडे वाईट नजरेने पाहून त्या महिलेचा डाव्या हाताचा दंड पडून महिलेच लज्जा निर्माण हाेईल असे कृत्य केले. यास महिलेने विराेध केला असता, संशयीत गवळी यांने चाकूने मारून टाकील अशी धमकी दिली. यावेळी महिलेचा पुतण्या हा तेथे वाद साेडविण्यास आला असता, त्यास सुध्दा शिवीगाळ, दमदाटी केली. म्हणून महिलेच्या फिर्यादीवरून गवळी विरूध्द शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चाैधरी पुढील तपास करीत आहे.