⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | ओझरखेडा धरणात 70 टीएमसी पाणी सोडावे

ओझरखेडा धरणात 70 टीएमसी पाणी सोडावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर येथील हतनूर पाणलोट क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण चांगल्या क्षमतेने भरले आहे. हतनुर धरणाचे दरवाजे उघडे असल्याने वाहून जाणार्‍या पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

हतनुर धरण ‘ओफरफ्लो’ असल्याने वाहून जाणार्‍या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ओझरखेडा धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ करुन 70 टीएमसी पाणी सोडण्यात यावे. पाणी सोडण्याचा खर्च संबंधित विभागाला शक्य नसल्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली होती. त्यानंतर ओझरखेडा धरणात 30 टीएमसी पाणी सोडण्यात आले व आता यात वाढ करुन 70 टीएमसी पाणी साठविण्याबाबत आमदार पाटील यांनी मागणी केली आहे. या धरणातील पाण्यावर भुसावळ तालुक्यातील असंख्य शेतकरी व औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर हा प्रकल्प पुर्णत: अवलंबून आहे. 70 टीएमसी पाणीसाठा सोडण्यात आल्यास शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह