⁠ 
रविवार, मे 19, 2024

जनसंवाद यात्रेत ग्रामस्थांकडून वाचले जाताहेत समस्यांचे पाढे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील खेड्यापाड्यात राष्ट्रवादीतर्फे सुरु असलेल्या जनसंवाद यात्रेने वेग धरला असून ग्राणीम भागातील जनतेला भेटी देऊन त्यांच्या असलेल्या विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न ऍड. रोहीणी खडसे-खेवलकर यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील दिसुन येत आहे. प्रत्येक गावागावांत काहीना काही समस्या, लोकांच्या अडी अडचणी आहेतच. गावागावात घेण्यात येणाऱ्या बैठकीत असंख्य ग्रामस्थ वैयक्तीक तसेच गावपातळीवरीर सार्वजनिक समस्याचा पाढा वाचताना दिसुन येत आहे. ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या अठराव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु डी पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, जि प सदस्य निलेश पाटील, प स सदस्य विकास पाटील, अतुल पाटील, डॉ बि सी महाजन, सरचिटणीस रविंद्र दांडगे,म हिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष नंदू हिरोळे, तोतारामजी भोलाने,राजेंद्र चौधरी,वसंतराव तळेले बाळाभाऊ भालशंकर ,जुलाल पाटील,रउफ खान, शाहिद भाई खान, मुन्ना बोडे, प्रविण दामोधरे,रंगलाल रायपुरे, नंदकिशोर नमायते, विशाल रोठे,निलेश भालेराव, चेतन राजपुत , अजाबराव पाटील, नितीन पाटील , मयुर साठे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सुकळी येथील बैठकीत जेष्ठ नागरिक पंडीतराव पाटील, साहेबराव पाटील, माणिकराव पाटील,नाना पाटील, नंदकुमार नमायते,उपसरपंच अनिल कोळी,ग्रा पं सदस्या शारदा कोळी,रविंद्र कोळी, सुनिल कोळी,कांताबाई पाटील,विजय पाटील,समाधान गायकवाड,प्रमोद गायकवाड,निना पाटील,कडु पाटील,संजय पाटील, विरेंद्र पाटील,निवृत्ती कोळी,शंकर कोळी यांच्यासह डोलारखेडा येथील पुंडलिक वालखड,सुरेश कोळी, बाळू इंगळे, विनोद इंगळे, भारत इंगळे, रवी पाटील, संजय कोळी, लाला तांबे, एकनाथ भराडी, भाऊलाल तांबे, पंढरी पाटील, संतोष गरड,प्रभाकर पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सुकळी,दुई,डोलारखेडा येथे पार पडलेल्या जनसंवाद यात्रेत ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या गटारी,गावतर्गत रस्ते,घरकुल,यासह अनेक समस्यांचे कथन केले.यावेळी ऍड. रोहीणी खेवलकर यांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून जेवढ्या शक्य आहे तेवढ्या समस्या मी सोडवेल असे आश्वासन दिले.