⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | पोलीस पाटलांना अतिरिक्त जबाबदारीचा भार पेलवेना

पोलीस पाटलांना अतिरिक्त जबाबदारीचा भार पेलवेना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । अवैध वाळु वाहतुक प्रतिबंधक बंदोबस्तासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील पोलीस पाटलांना कर्तव्य सोपविण्यात आले. मात्र, पोलीस पाटलांवर अतिरीक्त भार पडत असल्याने तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षकतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

तहसीलदार मुक्ताईनगर यांच्या आदेशान्वे दि.१ ऑक्टोबर पासुन अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी बंदोबस्त म्हणुन पोलीस पाटलांच्या पाळ्या लावण्यात आलेल्या आहे. मात्र सदर जबाबदारी पार पाडत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच पोलीस पाटील यांच्या नियुक्त्या शासन दरबारी अधिनियमानुसार गावापुरती मर्यादित असून अशा पद्धतीने पाळ्या लावून पोलीस पाटलांच्या न्याय हक्कावर गदा आणली जात असल्यांचे वाटत आहे. याशिवाय महिला पोलीस पाटील यांच्याही ड्युट्या लावल्या जात असल्याने सदर कर्तव्य बजावत असताना अनेक समस्या उद्भवत आहे. मिळणाऱ्या तोडक्या मानधनावर प्राथमिक गरजा पुर्ण करणेसुद्धा कठिण असताना, ४० ते ५० किमी अंतरावर आठवड्यातुन दोनदा ड्युटीवर जात असताना एक वेळेस १५०-२०० रुपये खर्च होत आहे. महिन्याकाठी ८ वेळा ड्युट्या करतांना १५०० रुपयापर्यत खर्च होईल.तरी ड्युट्या लावत असतांना याबाबत प्रामुख्याने विचार व्हावा. वाळु माफीयांकडीन होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यापासुन कोणीही अपरीचित नाही.यामुळे सुरक्षिततेबाबत ठोस धोरण जाहीर करावे.ज्या ठिकाणी ड्युट्या आहेत त्याठिकाणी जंगली हिस्र श्वापदांचा वावर असल्याने जिवीतास हानी पोहचू शकते असा प्रसंग ओढवलाच तर पश्चात परिवाराचे काय? हाही विचार केला जावा.

आमच्या गावाच्या कार्यक्षेत्रातच आम्हाला कोणतीही जबाबदारी दिली तर आम्ही पुर्ण पार पाडु. तोडक्या मानधनात गरजा भागत नसून चरितार्थ चालवण्यासाठी इतर व्यवसायाच्या माध्यमातून किंवा मोलमजुरी करुन जीवन जगत असल्याचे पोलीस पाटील संघटनेने निवेदनातुन व्यक्त केले. प्रसंगी अध्यक्ष दिलीप पाटील,सदस्य संदिप इंगळे,गुलाब कोचुरे,कैलास बेलदार,सुनिल तायडे यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह