महाराष्ट्र

एसटी कंत्राटी चालकांचे ‘या’ तारखेपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना महामंडळात कायम स्वरूपी समाविष्ट करावे, यासाठी दि. १७ ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई येथे कत्राटी चालकांकडून आमरण उपोषण पुकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्दीस देण्यात आली आहे.

महाराष्ट्र भरातील एसटी कामगरानी विविध मागण्यासाठी संप पुकारले होते. शासनाने अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी अल्टीमेंन्ट देवूनही संप कायम ठेवला होता. सहा माहिने संप सुरूच होते, प्रवाशांचे हाल, शाळेच्या विद्यार्थ्याचे हाल होत होते. दरम्यान, शासनाने कत्राटी चालक भरती करण्याचे निर्णय घेतले. व एसटी महामंडळ मार्फत नियमानुसार मेडिकल चेकप कागद पळताळणी असे प्रक्रिया करून एसटी ने एक दिवसाची चालक प्रशिक्षण घेवून कायद्यानुसार महाराष्ट्रभरातील ८०० कत्राटी चालंकाना भरती केले.

त्यानंतर त्यांना आप आपल्या विभागात नेमणूक देण्यात आली. तरीही संपातील एसटी कर्मचारी हे संपात अतिशय भरभक्कम धाटीने संपात उभे होते. कत्राटी चालक यांच्या हातीत लालपरीचे स्टेरिंग देण्यात आले तेव्हा खूप मेहनतीने कत्राटी चालक यांनी आपली कामगीरी सुरु केली. ९ महिने साथ देणारे हे कत्राटी चालक यांना एसटी महामंडळाने कोणतेही सूचना न देता. ३ सेप्टेंबर रोजी पत्र देवून कत्राटी चालकांना बंद करण्यात आले.

परिणामी महाराष्ट्रातील लालपरीला जीवनदान देणारे व हातातले काम सोडून महामंडळाची लाज ठेवणारे कत्राटी चालक यांच्या कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे. आता महामडळाने अचानक कत्राटी चालकांना वाऱ्यावर सोडले आहे. या कत्राटी चालकांनी आमदार, खासदार यांना शिपारस पत्र दिले तसेच मुख्यमंत्री एकानाथ शिंदे हे पाळधी सभेला आले असताना कत्राटी चालकांनी चालत्या सभेत पोस्टर दाखवले होते. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी तुमचा विचार करणार तुमच्यावर अन्याय झाले आहे एसटीचे काम पुरे करणार असे आश्वासन दिले होते.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला सलग दोन महिने झाले असून देखील यावर अद्याप मंत्री महोदयांनी तडगा न काढल्यामुळे अखेर कंत्राटी चालकांनी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण पुकारणार असल्याचे ननिर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button