लग्नाचे आमिष दाखवून १२ वर्षीच्या मुलीवर अत्याचार, १८ वर्षीय तरुणाला अटक !
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । बारा वर्षाच्या बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत करणा-या तरुणावर भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश योगेश तायडे असे त्याचे नाव आहे.
संशयित आरोपी भावेश याने सर्वप्रथम 23 जुलै रोजी शाळेच्या गेटवर पिडीत बालिकेस बोलावून तिची भेट घेतली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तो तिला त्याच्या स्कुटीवर बसवून सात नंबर पोलिस चौकीच्या मागे पडीक रेल्वे क्वार्टरच्या रुममधे घेवून गेला. तेथे तू मला खुप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तिच्याशी गोड बोलून अंगलट करुन पीडित तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा 19 ऑगस्ट रोजी त्याने तिला शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटरवर बसवून जामनेर रोडवर एका गार्डनमधे नेले. त्याठिकाणी देखील पिडीतेसोबत अंगलट केली. तसेच गेल्या दोन महिन्यापासून सतत पिडीतेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवले.
यानंतर भावेशने पिडीतेला तिचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार 10 ऑक्टोबर रोजी भल्यापहाटे साडेचार वाजता पिडीता पालकांच्या संमतीशिवाय घर सोडून भावेशकडे गेली. याप्रकरणी पिडीत बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश तायडे याच्याविरुद्ध गु.र.न. 172/22 भा.द.वि. 376(1), 376 (2), (आय), 363, 354, अ (1) (आय), 354 (ड), 323, 506 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश यास अटक करण्यात आली असून स.पो.नि. प्रकाश वानखेडे पुढील तपास करत आहेत.