Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । शहरातील पोलन पेठेतील एका दुकानातून २ लाख ५४ हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजार पेठेतील पोलन पेठे भागात महाराष्ट्र फटाका या दुकानातून दि. ५ रोजी संध्याकाळी ते दि ६ रोजीच्या सकाळच्या दरम्यान कुणीतरी अनोळखी व्यक्तीने दुकानातील कापडी पिशवीत असलेले २ लाख ५४ हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यानंतर दुकान मालक शब्बीर इलियास अमरेली यांनी दि ८ रोजी जळगाव शहर पोलीसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.ना. विजय निकुंभ हे करीत आहेत.