निष्ठावान महापौर, विरोधी पक्षनेते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जाणार!
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवतीर्थावर जाणार आहे. शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा हाच खरा दसरा मेळावा असल्यामुळे यावेळी हे दोघेही कडवट शिवसैनिक या ठिकाणी जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यामुळे एक दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे तर्व दुसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. अशावेळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला समर्थन देण्यासाठी जाणार आहेत.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. मात्र महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी कोणतीही बंडखोरी न करता खऱ्या शिवसेनेसोबत राहून आपली निष्ठा दाखवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाजन दाम्पत्याने आपले समर्थन दर्शवले असून पुन्हा एकदा पक्षाला बळ मिळावं यासाठी विरोधी पक्षनेते सुनील महाजन व जयश्री महाजन हे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जाणार आहेत.