अजितदादा फडणवीसांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नका : गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । ‘देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता किती आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. गेल्या काळात आपण काय काय पराक्रम केलेत हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही फडणवीसांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नका,’ असा सल्ला गिरीश महाजन यांनी अजित पवारांना दिला आहे.
राज्य सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणले कि, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे.
दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही काल प्रतिक्रिया दिली. ‘येत्या काळात त्यांचं राज्य आलं आणि त्यांनाही 2-4 जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे, याचा गुरूमंत्र मी त्यांनाही देईन. माझ्याकडे हे जिल्हे नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आले आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, त्यामुळे 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसला आहात?’, असं फडणवीस म्हणाले.