बिग ब्रेकिंग : निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यानिमित्ताने बकाले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे सांगितले.
भुसावळ कोर्टातून नुकताच जळगाव न्यायालयात आलोय. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळण्याची नेमकी कारणं आदेश वाचल्यानंतरच सांगता येतील. परंतू पोलिसांच्या अहवालात ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यापासून किरणकुमार बकालेंनी आपला मोबाईल दि.१५ सप्टेंबर पासून बंद करून ठेवलेला आहे. बकाले देखील सहाय्यक फौजदार महाजन यांच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत.
ऍड. गोपाळ जळमकर