सर्पमित्र तुषार रंधे ‘द रिअल हिरो’ अवॉर्डने सन्मानित
nashirabad news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । नशिराबाद येथील वन्यजीव संरक्षण जळगाव जिल्ह्याचे सदस्य तुषार रंधे याला नुकतेच ‘द रिअल हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विवेकानंद शिक्षण प्रसारक पेहणी जि. हिंगोली यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. तुषार याचे सर्पतज्ञ गुरुवर्य डॉ.संजय नाकाडे व तज्ञ गुरुवर्य निलीम खैरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
तुषार याने वन्यजीव साप, विंचू, घोरपड, सरडा, गुहिरे. तसेच जखमी प्राणी कबूतर, चिमणी, कावळा, बगळा, मांजर, कुत्रा, सरडा अशा विविध प्रकारचे वन्यजीव यांचे रक्षण करणे व त्यांना निसर्गाच्या स्वाधीन करणे हे कर्तव्य समजून कार्य केले. त्याबद्दल ‘द रिअल हिरो’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राणी मित्र सर्पमित्र विजय पाटील, मित्र मंडळ हिंगोली व संपूर्ण महाराष्ट्रातील प्राणी मित्र व सर्पमित्र उपस्थित होते.
यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय बांगर, जळगाव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, उपसरपंच माजी कीर्तिकांत चौबे, माजी ग्रा. पं. सदस्य विनोद रंधे, न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, वन्यजीव संरक्षण जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे या सर्वांनी तुषार याचे अभिनंदन केले.