⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | जळगावच्या खड्डयांनी वाढवली वाहन मालकांची डोकेदुखी, खिशाचा ताण वाढला

जळगावच्या खड्डयांनी वाढवली वाहन मालकांची डोकेदुखी, खिशाचा ताण वाढला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहरातल्या रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.यात काही नवीन नाही. मात्र नवीन हे कि याचा केवळ नागरिकांनाच नव्हे तर वाहनांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे वाहने मोडकळीस येत आहेत. या वाहनांच्या दुरुस्तीसाठी वाहनचालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या महिनाभरात गाड्या दुरुस्तीचे काम वाढले असे मेकॅनिक सांगत आहेत.

शहरातील रस्त्यांची आधीपासूच झालेली चाळण आणि त्यावर पंधरा दिवसात झालेला मुसळधार पाऊस यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आधीच रस्त्यावर असलेले खड्डे दुप्पट मोठे झाले असून, गाडी चालवायची की खड्डे चुकवायचे असा प्रश्न वाहनधारकांना पडू लागला आहे. शहरात एकही भाग नाही जेथे खड्ड्यांचा सामना करावा लागत नाही. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना शरीर अक्षरशः खिळखिळे होत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनांमध्येही बिघाड होण्याचेप्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने गाडी पंक्चर होणे, शॉकऑब्झर आणि टायर खराब होणे हे त्रास अधिक भेडसावत आहेत. वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेजवर रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरापासून “शहरातील रस्ते खराब असून गाडी सतत बिघडत आहे. सलग दोन महिन्यांपासून गाडीला दुरुस्तीसाठी गॅरेजवर आणावे लागते आहे. यामुळे खर्च वाढला असून महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मनीष बारी , नागरिक

जळगाव शहरात असलेल्या खराब रस्त्यांमुळे नागरिकांची वाहन अधिक खराब होत आहे. नागरिक आपल्या गाड्या रिपेयर करण्यासाठी अधिक प्रमाणावर येत आहे. आमचा व्यवसाय जरी चांगला सुरु असला तरी रस्ते खराब असल्यानाने नागरिकांचे नुकसान होत आहे.
नूर भाई , गॅरेज व्यावसायिक

खिशाला भुर्दड (रुपयांमध्ये)

शॉक ऑब्झर दुरुस्ती : २ हजार हजार

इंधन टाकी गळती :२० हजार

टायर बदलणे : २ हजार

चाकांचे पंक्चर: ५० ते १०० रुपये

author avatar
टीम जळगाव लाईव्ह