Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाला पैसे काढून देण्याच्या निमित्ताने भामट्यांनी एटीएमची अदला-बदली करीत 20 हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सुधाकर सोनवणे (19, कांचन नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्यास असून शनिवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता भिलपूरा चौकातील ओव्हरसीज बँकेच्या एटीएम येथे पैसे काढण्यासाठी गेला असता तेथे तीन अनोळखी व्यक्ती उभे होते. दीपक सोनवणे हा पैसे काढत असतांना पैसे न निघाल्याने इतर तीन जणांनी पैसे काढण्यास मदत केली. यात तीनही भामट्यांनी पीन नंबर चोरून बघितला आणि तरूणाचे एटीएम कार्ड अदला-बदली करून घेत तरुणाच्या खात्यातून 20 हजार रुपये परस्पर काढले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात तीन जणांविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील करीत आहे.