⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Big Breaking : मालेगावसह देशभरात NIA चे छापे, जळगावातून एटीएसने एकाला घेतले ताब्यात!

Big Breaking : मालेगावसह देशभरात NIA चे छापे, जळगावातून एटीएसने एकाला घेतले ताब्यात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात पहाटे चारच्या सुमारास अकोला एटीएसच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. मेहेरूण परिसरात हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमार सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तशात दुसरीकडे जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. जळगावच्या पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे

दरम्यान, ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसापासून जळगावात लपून बसलेला होता. त्याचे नाव अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह