पाचोरा आगाराची बस पिंपळगावला खड्ड्यात फसली.. सुदैवाने अनर्थ टळला!

सप्टेंबर 19, 2022 6:42 PM

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । पाचोरा आगाराची बस पिंपळगाव (हरेश्र्वर) गावानजीक अरुंद रस्त्यामुळे खड्ड्यात फसफसली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसून मात्र अरुंद रस्त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

jalgaon 47 1

पाचोरा आगाराची बस (क्रं. एम. एच. १४ बी. टी. २०७९) ही प्रवाशी पाचोरा ते पिंपळगाव (हरेश्र्वर) बस आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंपळगाव (हरेश्र्वर) च्या दिशेने निघाली. दरम्यान पिंपळगाव (हरेश्र्वर) स्थानकात पोहचण्याच्या आधी काही अंतरावर मनुदेवी मातेच्या मंदिराजवळ अरुंद रस्त्या असल्याने बस चालकास अंदाज न आल्याने सदरची बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जावुन फसली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील अनर्थ मात्र निश्चित टळला आहे. तसेच हा अरुंद रस्ता जीवघेणा ठरत असुन या रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करावे अशी मागणी बस मधील प्रवाशी तसेच स्थानिक नागरिकांकडुन जोर धरु लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now