जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात चमचमीत खायला आवडतं. त्यातच जर सुट्टीचा वार किंवा काही स्पेशल असेल तर नागरिक आपसूकच बाहेरून काहीतरी मागवतात. मात्र तुम्ही खात असलेली वस्तू, तुम्ही खात असलेल खाद्य हे कुठे बनत हे तुम्हाला माहिती आहे का?
आपण जे खात आहोत ते कुठे बनले आहे? ते कशाप्रकारे बनले आहे? ते कोणाच्या हाताने बनले आहे? जिथे ते बनते तो परिसर कसा आहे? हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही सुजाण नागरिक आहात. याचा अर्थ तुम्ही जे खाता त्याची माहिती घेऊनच तुम्ही ती वस्तू खाता. मात्र शहरात असे कित्येक नागरिक हे बघत नाहीत. त्यांना कोणतेच प्रश्न पडत नाहीत. ते खात असलेल खाद्य कसं आहे? या पेक्षा ते खाद्य किती चविष्ट आहे हे त्यांना महत्वाचं वाटत. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.
जळगाव शहरामध्ये कित्येक ठिकाणी मांडे म्हणजेच मोठमोठ्या चपात्या बनवल्या जातात. सध्या असाच एक जळगाव शहरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो नक्की जळगाव शहरातील कोणत्या भागातला आहे. हे सांगणं कठीण आहे.
काय आहे फोटो मध्ये?
या फोटोमध्ये दाखवल गेल आहे की, एका मांडे बनवण्याच्या भट्टीमध्ये कुत्रा शिरून बसला आहे. यामुळे या ठिकाणच खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.