जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील चितोडा येथील वयोवृद्धाच्या कॅरीबॅगला ब्लेड मारून 20 हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील सेंट्रल बँकेच्या जवळ अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मुरलीधर मोहन पाटील (68, रा.चितोडा) हे चप्पल घेण्यासाठी थांबले होते व तत्पूर्वी त्यांनी बँकेतून 20 हजार रुपये काढले. ते पैसे त्यांच्या कॅरीबॅगमध्ये होत मात्र चप्पल घेत असताना भामट्याने 20 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार मुरलीधर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावल पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.