वरणगावला पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात वरणगाव ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच वृक्षरोपणाला सुरुवात करण्यात आली. हर घर झाड हे अभियान राबवण्याचा संकल्प भाजपाने केल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी सांगितले.
हाजी अल्लादीन शेठ, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, कदीर शेठ, नटराज चौधरी तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता पाटील, भाजयुमोचे अध्यक्ष आकाश निमकर आदींची उपस्थिती होती. वृक्ष मित्र म्हणून कैलास पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमाला कमलाकर मराठे, डॉ.सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा संगीता माळी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी क्षितीजा हिडवे, कामगार नेते मिलिंद मेढे, कृष्णा माळी, ज्ञानेश्वर देवघाटोळे, शालिग्राम डोयसे, नूर सेठ, जिल्हा चिटणीस अरुण बावणे, तालुका सरचिटणीस मुस्लिम भाई अन्सारी, किसान मोर्चाचे मयूर शेळके, जय चांदणे, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, अनिल वंजारी, गोविंदा चौधरी, संतोष नारखेडे, शेख राजा सुमित तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.