⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना १० जुलै २०२२ रोजी जळगाव शहरात घडली होती. या प्रकरणातील आरोपीला शनिवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

सौरभ वासुदेव खर्डीकर (26, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. शहरात भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १० वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर आरोपी सौरभ वासुदेव खर्डीकर याने १० जुलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजता शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड केला आला होता.

या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात १० वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष व रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि वैद्यकीय अधिकारी तसेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ठरल्या.

साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सौरभ खर्डीकर याला दोषी ठरवत विविध कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ७० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून किरण पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह