---Advertisement---
निधन वार्ता महाराष्ट्र

सलग ९ वेळा खासदारकी गाजवणाऱ्या माणिकराव गावीत युगाचा अस्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । सलग ९ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी निधन झालं आहे. नाशिकधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली. उद्या नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

manikrao Gavit jpg webp

नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन ते सदस्य म्हणून निवडून आलेत. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले. १९८० साली नवापूरचे आमदार झाले, माणिकराव गावीत हे प्रथमच १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे 47 वय होते. तेव्हा पासुन ते आतापर्यंत तब्बल 9 वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणा-या टॉपटेन खासदारामधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झालेत.

---Advertisement---

१९८१ ते २००९ हा माणिकरावजी गावीत यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. १९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.

१९९८-९९ या काळात लेबर अँड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. १९९९ ते २००१ या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. श्रीमती सोनीयाजी गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---