धरणगावला नगरपालिकेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार!

सप्टेंबर 16, 2022 6:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । धरणगाव नगरपालिकाच्या वतीने स्वतंत्रचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासनामार्फत विविध कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले होते. या कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला सन्मान पत्र प्रधान करण्यात आले.

jalgaon 24 1

विशेष कार्य करणारे आरोग्यचे निलेश वाणी, महेश चौधरी, गोपाल चौधरी याचा विशेष प्राविण्य देऊन पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कालावधीत यांनी उत्कृष्ट कामगिरी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.  तसेच धरणगाव शहरात मुख्य चौकात 100 फुटी तिरंगा फडकवण्यात आला होता, शाळा कॉलेजमध्ये गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रम नपातर्फे आयोजित करण्यात आले होते.

धरणगाव नगरपालिकाचे मुख्यधिकारी पवार यांनी कर्मचारी यांचा भविष्यात उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व उत्साह होता.  कार्यक्रमावेळी कार्यालयीन अधिक्षक संजय मिसर, लेखाधिकारी ज्ञानेश्वर दिघोडे, बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, आस्थापना प्रमुख योगाराज तळेराव उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करनिरीक्षक प्रणव पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू माळी, गणेश पाटील, अशोक चव्हाण, संजय शुक्ला, जयेश भावसार, किशोर खैरनार, नारायण माळी, तुषार सोनार, रितेश जोशी, मुजमिल शेख, अण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, हनिफ शेख आदी कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now