जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. याचबरोबर वादळी वारा देखील सुरू आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशावेळी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील केळी, मका, कापूस व लिंबू या चार पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तर दुसरीकडे, जवळजवळ ७६६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने अहवाल पाठवला असून जिल्ह्यातील जवळजवळ 22 गावे या पावसामुळे बाधित झाले आहेत. असे या अहवालात म्हटले आहे.
तर, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतके दिवस पाऊस न मिळाल्याने शेतकरी आपले पीक बिना पावसाने जगवत होता. मात्र आता जो पाऊस आला त्यामुळे पिकाचे अजून नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी राजाला नक्की करावे तरी काय? असा प्रश्न पडला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ६० मिलिमीटर, जळगाव तालुक्यात ५१.८ मिलिमीटर, भुसावळ तालुक्यात ३६ मिलिमीटर, चोपडा तालुक्यात ४९, मुक्ताईनगर तालुक्यात ४०.३ इतका पाऊस झाला असा अंदाज आहे.