Lumpy Skin : ग्रामविकास मंत्री ना. महाजनांच्या प्रयत्नांनी वरणगावात ८०० लस उपलब्ध!
Varangaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात (Lumpy Skin) या संसर्गजन्य रोगाने थैमान घातला असून अनेकांचे पशु मयत झाले आहेत. या रोगाला संपुष्टात आनण्यासाठी शासन सतर्क झाले असून जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी गुरांवर लसीकरण सुरु झाले आहे. वरणगाव येथे देखील ग्रामविकास मंत्री ना. महाजनांच्या प्रयत्नांने व भाजप किसान मोर्चाच्या मागणीने ८०० लस उपलब्ध झाल्या आहेत. शहरात घरो घरी जाऊन गुरांना पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना उभाडे व कर्मचारी लस टोचत आहे. दरम्यान, शहरातील सर्व शेतकरी बांधवांनी या मोफत लसचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
वरणगाव शहरात लांपी आजार सदुर्श्य गाई, बैल मोठ्या प्रमाणात आढळत आहे. लस घेण्यासाठी अनेक दिवसांपासून शेतकरी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना उभडे यांच्याकडे जात होते, लस नाही अशीच उत्तरे येत होती. शेतकरी हरचंद धनगर, भगवान कुसूनंबे, बाळा धनगर, सुनील वंजारी, पवन माळी, अंकुश माळी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना ही माहिती दिली आणि लागलीच सुनील काळे सुनील माळी अरुण बावणे ऋषिकेश महाजन मयूर शेळके भाजपाचे पदाधिकारी दावखाण्यात आले आणि डॉ.दर्शना उभाडे यांना विनंती केली.
तसेच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना हा सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, नामदार गिरीश महाजन यांनी लागलीच पशू अधिकारी यांना आदेश देऊन दुपारी चार वाजेपर्यंत वरणगाव पशू वैद्यकीय दवाखण्यात ८०० लस उपलब्ध करून दिल्या. आज पशू वैद्यकीय अधिकारी दर्शना उभाडे त्यांचा सरा स्टोफ कोल्हे, एकनाथ मराठे व इतर सर्व वरणगाव शहरात प्रत्येक शेतकरी बांधवांना गोठ्यात जाऊन गाई बैल यांना लंपी आजार होऊ नये, म्हणून प्रतिबंधक लस गुरांना सकाळ पासून टोचत आहे.
दरम्यान, शहरातील सर्व शेतकरी बांधवांनी या मोफत लसचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत असून गुरांची काळजी घेण्यासाठी सतर्क राहावे थोडी ही लक्षण दिसल्यास स्थानिक पशू वैद्यकीय अधिकारी ड. दर्शना उभाडे यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान माजी नगराध्यक्ष सुनील काळे, किसान मोर्चाचे जिल्हा चिटणीस अरुण बावणे, तालुका अध्यक्ष ऋषिकेश महाजन, मयूर शेळके सुनील माळी भाजपा शहराध्यक्ष आकाश निमकर भाज्युमो अध्यक्ष यांनी केले आहे.