⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल तालुका सकल मराठा समाज आक्रमक, बकाले यांना बडतर्फ करा!

यावल तालुका सकल मराठा समाज आक्रमक, बकाले यांना बडतर्फ करा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yawal news-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले चांगलेच चर्चेत आले आहे. त्याच्याविरोधात राज्यासह जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून विविध ठिकाणी निषेध केला जात आहेत. तसेच यावल तालुक्यातील मराठा समाजामध्ये देखील तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना बकाले यांना सेवेतुन तात्काळ बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन देत समाजाच्या वतीने तीव्र संतापजनक भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत . किरण कुमार बकाले यास बडतर्फ करण्याची कारवाई न केल्यास समाजाच्या वतीने राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे.

येथील तालुका मराठा समाजाच्या वतीने भुसावळ रस्त्यावरील तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन पर्यंत भर पावसात शेकडोच्या संख्येने मोर्चा नेत तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त करत समाजाच्या वतीने अशा अधिकाऱ्यास सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. बडतर्फ न केल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

आंदोलनात किनगाव चे विजयकुमार देवचंद पाटील, दहिगाव चे उपसरपंच देविदास धांगो पाटील, देवकांत पाटील, वसंत पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.संजय कदम, छाया अतुल पाटील, वर्षा अजय पाटील, मनीषा गावडे, डी.सी.पाटील, एड. डी. आर.बाविस्कर, दिनकर क्षीरसागर, सुनील गावडे, डी.बी. पाटील, गणेश महाजन, ए.एन.यादव, एम.ए.पाटील, किरण शिंदे, बापू जासूद, तुषार येवले, दिलीप इंगळे, विलास येवले, हेमंत येवले, प्रा. मुकेश येवले, एकनाथ शितोळे, समाधान पाटील, दौलत मराठे, यशवंत जासूद, रवींद्र टोंगळे, यशवंत भोईटे, निलेश पवार, प्रकाश पवार, भूषण पवार, अशोक पाटील, शैलेश पवार, पप्पू पाटील, विजय यादव, गोपाल जासूद, विजय पाटील, समीर पवार, सुनील येवले, महेश पाटील, प्रवीण पाटील, अमोल खैरनार, एन.पी .चव्हाण, योगेश चव्हाण, अनिल सोनवणे, अक्षीत जासूद, संजय पाटील, राकेश शिर्के, विलास पवार, नरेंद्र पाटील, गणेश येवले, गोकुळ भोईटे यांचे सह तालुक्यातून अनेक समाज बांधव उपस्थित होते.

सामाजिक तेढ निर्माण करणारे अधिकारी कलंक
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, राज्यात मराठा समाज पालकत्वाची भूमिका निभावत असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जात असताना पोलीस विभागातील एका जबाबदार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविषयी असं संभाषण करणे म्हणजे पोलीस विभागाला कलंक असल्याचे म्हटले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह