धरणगावला बैलजोडी लिलावाचे आयोजन!

सप्टेंबर 15, 2022 4:32 PM

dharangaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । धरणगावला सालाबादा प्रमाणे यंदाही येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचा वतीने दि. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत रथ व वहन उत्साहास प्रारंभ होत असून वहनास लागणारी बैलजोडीचा जाहीर लिलाव दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

jalgoan 9 jpg webp

बैलजोडी लिलावास जिल्हासह तालुका व शहर परिसरातील भक्तानी जास्तीत जास्त बोली लाऊन सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्य अध्यक्ष जिवन आप्पा बयस, सेक्रेटरी प्रशांत वाणी, सेक्रेटरी अशोक येवले, खजिनदार किरण वाणी व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now