कंपन्यांकडून आजचे इंधन दर जाहीर ; वाचा पेट्रोल डिझेलचा नवीन दर

सप्टेंबर 15, 2022 9:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत. क्रूडची किंमत सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतीवर कोणताही परिणाम झाला नाही. आज कंपन्यांकडून इंधनाचे नवे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे च आहे. Petrol Diesel Rate Today

petrol diesel 2

यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यांनतर तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now