गुन्हेजळगाव जिल्हा

दुर्दैवी : नागाई-जोगाईजवळ एक तरुण बुडाला, चौघांना वाचविण्यात यश!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात विविध घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनांनी जिल्हा हादरला. घात, पात अपघात हे तर नित्याचेच झाले आहेत. मात्र सर्वाचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन झाले आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच जणांवर बंधणे होती. ती यावेळेस नसल्याने गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. मात्र हे करत असतानाच एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुखाचे डोंगर कोसळले. यात दोनच दिवसात वेगवेगळ्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा नागाई-जोगाई परिसरात काही तरुण पाण्यात पोहण्यासाठी आले. मात्र, ते तरुण पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांना धाव घेतली व चौघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक तरुण अद्याप मिळून आलेला नाही.

जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळ राहणाऱ्या १५ ते २० वर्षीय तरुण-तरुणींचा गट आज कांताई बंधारा, नागाई-जोगाई परिसरात आले होते. पाण्यात पोहताना चौघे बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांना धाव घेतली. घटनेत चौघांना वाचविण्यात यश आले असून दोन तरुणी, एका तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर नयन निंबाळकर (वय-१६) हा अद्याप मिळून आलेला नाही. दरम्यान, नाशिक परिसरात पाऊस पडल्याने गिरणा पात्रात पाणी वाढले आहे.

दुर्दैवी : बालक गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडाला, गणेशभक्त तरुणाने उडी घेऊन बालकाचे प्राण वाचविले, मात्र..
किशोर राजू माळी (वय ३०) या तरुणाला कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसले, त्यांनी लागलीच उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले. मात्र किशोरचा बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला. किशोर या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैवी : खडकीचा बालक गणेश विसर्जनासाठी गेला, मात्र..
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावातील सौरव शत्रुघ्न मोरे (वय १७) हा श्री विसर्जनासाठी तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गेला, त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बुडू लागला तर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणार्‍या कामगारांनी धाव घेत सौरवला बाहेर काढले. मात्र, तो पर्यंत उशीर झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरवच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परीवार आहे.

दुर्दैवी : कांताई बंधाऱ्यात तरूणाचा मृत्यू
जळगावच्या समता नगरातील भगवान नामदेव राठोड (वय १८) या तरूणाचा कांताई बंधाऱ्यात श्री विसर्जनादमऱ्यान बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि.९ रोजी चार वाजेचच्या सुमारास घडली.

माळपिंप्रीतील दोन तरुणांचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू!
किशोर आत्माराम पाटील (वय 31), नरेश संजय पाटील (वय 24, दोघे रा.माळपिंपरी) हे जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील पाझर तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान, या दोन्ही तरुण पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार, 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ही दुर्दैवी घटना घडली तर चौघे मात्र सुखरूप बचावले.

Related Articles

Back to top button