जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरामध्ये मुलं चोरी करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा संपूर्ण शहरामध्ये पसरवल्या आहेत. मात्र अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना केले आहे.
कोणत्याही पालकांसाठी आपलं मुल सर्वस्व असतं. यासाठी त्यांचे काळजी ही पालकांना असतेच. त्यातच काही दिवसांपासून जळगाव शहरामध्ये मुलं पळून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. अश्या प्रकारच्या अफवा संपूर्ण शहरामध्ये पसरल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी याबाबतच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. मात्र या सगळ्या केवळ अफवा असून याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना केले आहे.
पुढे मुंडे असेही म्हणाले की, जळगाव शहरातले पालक हे जागृत आहेत. शहरातील पालकांचे स्वतःच्या मुलांकडे चांगलेच लक्ष असते यामुळे अशी कोणतीही घटना घडली तर त्याची तात्काळ नोंद पोलीस स्थानकामध्ये पालकांतर्फे करण्यात येते. मात्र अशी कोणतीही नोंद शहरामध्ये करण्यात आल नाहीये. यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र याचबरोबर जर अशी कोणती घटना घडलीच तर लगेचच पोलिसांना याबाबत सूचना करावी.असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.