⁠ 
शनिवार, मे 18, 2024

नागरिकांनो सावधान.. हतनुर धरणाचे 8 दरवाजे उघडले, गणेश विसर्जन करताना काळजी घ्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

hatanur dame-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । तापी नदीचे पाणलोट क्षेत्रात काल दमदार पाऊस झाला असून हतनुर धरणाचे 8 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने नदीस मोठा पूर आला आहे. त्यामुळे भाविकांनी गणेश विसर्जन करताना काळजी घ्यावी गणपती नदीवरील पोहणारे व्यक्ती यांना विसर्जना साठी द्यावे, नागरिकांनी नदी काढी धोकादायक जागी जाऊ नये असे आवाहन हतनुर धरणाचे अभियंता यांनी केले आहे.

हतनुर धरणावर गणपती विसर्जनासाठी सकाळ पासून भाविकांची मोठी गर्दी असून रावेर तालुक्यातील सावदासह परिसरातील अनेक लहान मोठी गावे तर तापी तिरा पलीकडील वरणगाव व परिसरातील गावे येथील घरगुती तसेच मोठ्या मंडळांचे येथे गणेश विसर्जन येथे होत असते, यंदा देखील सकाळ पासून घरगुती गणपती व सोबत परिवारा सह येथे येत आहे तर सायंकाळ नंतर मोठी मंडळे येथे विसर्जनना साठी येतील.

दरम्यान, तापी नदीचे पाणलोट क्षेत्रात काल दमदार पाऊस झाला असल्याने हतनुर धरणाचे 8 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने नदीस मोठा पूर आला आहे त्यामुळे भाविकांनी गणेश विसर्जन करतांना काळजी घ्यावी गणपती नदीवरील पोहणारे व्यक्ती यांना विसर्जना साठी द्यावे, नागरिकांनी नदी काढी धोकादायक जागी जाऊ नये असे आवाहन हतनुर धरणाचे अभियंता यांनी केले आहे