⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगावात महसूलमंत्र्यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । राज्याचे पशुसंवर्धन व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेची’ खिल्ली उडवली आहे.”राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो जो कार्यक्रम सुरू आहे, त्याची चिंता करायला हवी” असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच माझे कुटुंब, तुमची जबाबदारी, सत्ता गेल्याचं वैफल्य असं म्हणत विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला आहे. Radhakrishna Vikhe Patil Ccriticism of Rahul Gandhi

सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली, मागच्या सरकारसारखं आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखं वागणार नाही. सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना आलंय, त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत, त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येक विरोधकाच्या टीकेला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

भारत जोडो यात्रा या मोहिमेवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे अशा शब्दांत बोचरी टीका केली. तसेच पक्षावर गांधी कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना नेता म्हणून स्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे असं टीकास्त्रही सोडलं आहे.