⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | साहेब.. स्वस्त धान्य दुकानात होणारा काळाबाजार थांबवा ना, इथे आम्हाला धान्य मिळत नाहीय?

साहेब.. स्वस्त धान्य दुकानात होणारा काळाबाजार थांबवा ना, इथे आम्हाला धान्य मिळत नाहीय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

​Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी बांधव वास्तव्यास असून त्यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य मिळत नसल्याने त्यांनी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने थेट तहसीदारांना निवेदन देऊन स्वस्त धान्य दुकानात होणारे काळाबाजार थांबवून, स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

यावल तालुक्यातील आदीवासी क्षेत्रातील राहणारे गोरगरीब आदीवासी मोठया प्रमाणावर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उर्दरर्निवाह करीत असतात, या सर्व नागरीकांकडे शिधापत्रीका असून ही सर्व मंडळी धान्य मिळण्यास पात्र असतांना देखील अनेकांना शासनाच्या मिळणारे स्वस्त धान्य अद्याप ही मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य घेणाऱ्या आदीवासी बांधवांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करतात, यावल तालुक्यातील एक ही स्वस्त धान्य दुकानावर सूचना फलक लावण्यात येत नाही. अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचे वजनकाटे हे प्रमाणीत केलेले नसल्याचे ही दिसून येत आहे.

याशिवाय तालुक्यातील आदीवासी गोरगरीब व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत धान्याचा साठा जमवून तो पध्दशीरपणे काळया बाजारात विक्रीला जात असून, या विषयाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी तसेच शिधापत्रीकाधारक आदीवासी बांधवांच्या कुटुंबाला त्वरीत धान्य मिळेल अशी व्यवस्था करावी, तसे न झाल्यास आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल असा ईशारा दिलेल्या निवेदनाच्या मध्यातून देण्यात आला आहे.

यावेळी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष फिरोज तडवी, जिल्हा संघटक रब्बील तडवी, जिल्हा सहसचिव फत्तु तडवी, तालुका अध्यक्ष सरदार तडवी, रहीम तडवी, रूबीना तडवी, रूखसाना तडवी, आशा तडवी, सायरा तडवी, यास्मीन तडवी आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह